Whats new

डिव्हाइन ईगल जगातील सर्वात शक्तिशाली विमान

Devine Eagle

चीन आणि रशियाने मिळून जगातील सर्वात शक्तिशाली विमान ‘डिव्हाइन ईगल’ ची निर्मिती केली आहे. हे विमान रडारच्या दृष्टीत न येणारे अमेरिकेचे अदृश्य विमान स्टील्थला देखील पाडण्यास सक्षम आहे. तज्ञांनी याला स्टील्थ विमानांचा शिकारी असे नाव दिले आहे. यामुळे हे अमेरिकेच्या हवाईदलाच्या सर्वोच्चतेसाठी आव्हान आहे कारण स्टील्थच्या बळावरच ते या क्षेत्रात आघाडीवर आहे.

स्टील्थ रडारवर देखील नजर : डिव्हाइन ईगल एवढे विशाल आहे की यात स्टील्थ ड्रोनला पकडण्यास सक्षम रडार देखील ठेवले जाऊ शकते. हे विमान अत्याधिक उंचीवर उड्डाण भरू शकते. एका अहवालानुसार या विमानाने अलीकडेच 500 किलोमीटर अंतरावरील दक्षिण कोरियाच्या किना-यावरील असणा-या स्टील्थ एफ-22 रॉफ्टरचा सिग्नल पकडला आहे.

तंत्रज्ञान : मागील 25 वर्षांपासून रशिया आणि चीन अत्याधुनिक रडार विकसित करत आहेत. त्यांनी एक मेगाहर्टत्झ ते दोन मेगाहर्टत्झ लो ब्रँडवाला व्हीएचएफ रडार तयार केला आहे, जो ढग-पावसाच्या आवाजापासून स्टील्थला देखील पकडण्यास सक्षम आहे. डिव्हाइन ईगलमध्ये हाच रडार लावण्यात आला आहे. याशिवाय हे विमान चिपसारख्या मॉडय़ूलने बनले आहे, जे अनेक प्रकारच्या रेडिओ वेव्हचे उत्सर्जन करतो. एंटीनाच्या समोर येत हे असे बीम निर्माण करतात, जे विशेष लक्ष्याला गाठू शकतात. व्हीएचएफ आणि हे बीम अदृश्य स्टील्थला देखील दृष्टीसमोर आणून देतात. नाझींनी सर्वात आधी दुस-या महायुद्धावेळी होर्टेन-229’ ‘विमान विकसित केले होते, जे रडारला चकविणारे पहिले विमान होते.