Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

5 वी चीन-भारत संयुक्त कवायत चीनमधील कुनमिंग येथे

India-China Exersice

दहशतवाद्याशी समर्थ प्रतिकार करण्यासाठी चीनमधील कुनमिंग शहरामध्ये भारतीय व चिनी सैन्यांची पाचवी वार्षिक कवायत सुरू झाली. 10 दिवसांच्या या कवायतीत दहशतवाद प्रतिबंधक उपाय यशस्वीपणे राबविण्याचा कार्यक्रम असल्याचे वृत्त आहे. या प्रात्यक्षिकांसाठी भारताने प्रथमच नागा रेजिमेंटमधील तुकडीचा उपयोग केला आहे. पूर्व कमांडच्या अधिपत्याखालील नागा रेजिमेंटमधील दुस-या बटालियनमधील 175 सैनिक हवाईदलाच्या आयएल-76 विमानाद्वारे कुनमिंग येथे दाखल झाले आहे. संयुक्त तुकडय़ांची प्रात्यक्षिके 22 ऑक्टोबरला केली जाणार आहे. भारतासह सीमेवर लक्ष केंद्रित असणा-या चीनमधील चेंगडू लष्करी प्रदेशातील 14 कोरमधील सैनिक या प्रात्यक्षिकात भाग घेणार आहेत. या प्रात्यक्षिकविषयक कार्यक्रमातील संयुक्त कवायतीत दहशतप्रतिबंधक उपायांचे प्रदर्शन केले जाणार आहे.

चेंगदू लष्करी विभागाचे उपकमांडर लेफ्टनंट जनरल झोऊ शियाओझोऊ यांनी उद्घाटन सोहळ्यात दहशतवादाविरुद्ध युद्ध सराव करीत असलेल्या जवानांना संबोधित केले. ते म्हणाले की, भारत आणि चीनदरम्यानचे उच्चस्तरीय दौरे व विशेष करून चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी गेल्या वर्षी केलेला भारताचा दौरा व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच केलेल्या चीनच्या दौऱ्याने द्विपत्रीय संबंधांना चालना मिळाली आहे.