Whats new

औद्योगिक उत्पादनात ६.४ टक्क्यांची वाढ; तीन वर्षांच्या सर्वोच्च पातळीवर

production

औद्योगिक उत्पादनात पुन्हा एकदा वाढ नोंदवण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात आयआयपी विकासदर वाढून ६.४ टक्क्यांवर गेला आहे. हा विकासदर तीन वर्षांच्या सर्वोच्च पातळीवर आहे. ऑक्टोबर २०१२ नंतर पहिल्यांदाच आयआयपी विकास दराने हा आकडा गाठला होता.

यामध्ये गेल्या तीन महिन्यांपासून ४ टक्क्यांच्या जवळपास विकास दिसत असल्यामुळे ही आकडेवारी महत्त्वाची ठरणार आहे. जुलै महिन्यात आयआयपीमध्ये ४.२ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. तर या आधी जून मध्ये आयआयपी ४.३६ टक्क्यांनी उद्योग उत्पादनाची आकडेवारी वाढली आहे. ऑगस्ट महिन्यात उत्पादन क्षेत्राचा विकासदर ६.९ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर जुलैमध्ये या क्षेत्रातील विकासदर ४.७ टक्के राहिला. तर एक वर्ष आधीचा विचार केल्यास याच महिन्यात उणे १.४ टक्क्यांवर आला होता. उत्पादन क्षेत्रात या निर्देशाकांची भागीदारी ७५ टक्के आहे.

भांडवली वस्तूंच्या विकासदरात ऑगस्ट महिन्यात २१.६ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. जुलै महिन्यात हा आकडा १०.६ टक्के होता. तर गेल्या वर्षी याच महिन्यात उणे ११ टक्के होता. इलेक्ट्रिसिटी क्षेत्रामध्ये सुधारणांची नोंद करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात इलेक्ट्रिसिटी क्षेत्रात ५.६ टक्क्यांचा विकासदर नोंदवण्यात आला. तो जुलै महिन्यात ३.५ टक्के होता.

ग्राहकोपयोगी वस्तूमध्ये वाढ : ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील विकासदर ऑगस्ट महिन्यात १७ टक्के होता. तोच गेल्या वर्षी याच कालावधीत उणे १५ टक्क्यांवर आला होता. तर जुलै २०१५ मध्ये ग्राहकोपयोगी वस्तूंचा विकासदर ११.४ टक्के होता. या व्यतिरिक्त मायनिंग क्षेत्राचा विकासदर ३.८ टक्के तर जुलै महिन्यात हा आकडा १.३ टक्के होता. तर ऑगस्ट २०१४ मध्ये हा आकडा २.६ टक्के होता.