Whats new

कैलास जैन यांना बेस्ट युथ चेअरमन पुरस्कार

KAILASH JAIN

दोंडाई येथील हस्ती बँकेचे चेअरमन कैलास जैन यांना बँकींग फ्रन्टीयर या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेने स्मॉल बँकींग कॅटेगिरीत बेस्ट युथ चेअरमन पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले आहे. १९७१ मध्ये बँकेचे संस्थापक कै. हस्तीमल जैन यांनी सर्वसामान्य व्यापारी व जनतेस सन्मान पुर्वक कर्जपुरवठा व बँकींग सेवा मिळावी म्हणून बँकेची स्थापना केली. बँक चालवितांना संचालक मंडळाने पाळावयाचे निती-नियमांची कठोर अंमलबजावणी करुन बँकेचा आर्थिक पाया रचला सन १९८० पासून बँकेचे नेतृत्व कांतीलाल जैन यांच्याकडे दिले. त्यांनी सलग ३५ वर्ष नेतृत्व करीत बँकेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्रभर करुन धुळे, नंदुरबार, जळगाव व नाशिक जिल्ह्यात बँकेच्या १५ शाखांचा विस्तार करुन अद्यावत तंत्रज्ञानाचा बँकेच्या कामकाजात पुरेपूर वापर करण्याचे धोरण अंगीकारले व त्यामुळे खान्देशातील एक अग्रगण्य बँक म्हणून नावारुपाला आली. त्यानंतर बँकेची धूरा कैलास जैन यांच्याकडे देण्यात आली. गेल्या तीन ते चार वर्षापासून ते बँकेचे चेअरमन आहेत. त्यांनीही बँकेच्या अध्यक्ष पदावर असतांना बँकेला नावलौकीक मिळवून दिला म्हणून त्याची दखल घेवून बँकींग फ्रन्टीयर या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेने स्मॉल बँकींग कॅटेगिरीत बेस्ट युथ चेअरमन पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले आहे.निरंतर कार्याचा सन्मान बँकेचे आधारस्तंभ कांतीलाल जैन, माजी अध्यक्ष मदन जैन, पहलाज माखिजा, भवरलाल जैन यांच्यासह संचालक मंडळ व व्यवस्थापकीय संचालक प्रकाश कुचेरिया, सहव्यवस्थापक माधव बोधवाणी, सहाय्यक जनरल मॅनेजर अनिल मराठे, सुनिल गर्गे यांच्यासह कर्मचारी वर्गाच्या सहकार्याने तथा बँकेचे भागधारक, ठेवीदार व ग्राहकांचा अटळ विश्वास आणि बँकेच्या गेल्या ४४ वर्षाच्या निरंतर कार्याचा हा सन्मान आहे.