Whats new

विश्व जलद बुद्धिबळ स्पर्धेत नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन विजेता

MAGANS KALsSON

भारताचा माजी विश्वविजेता ग्रॅंडमास्टर विश्वनाथन आनंद याने विश्व जलद बुद्धिबळ स्पर्धेत अखेरच्या दिवशी पाचपैकी चार लढती जिंकून प्रतिष्ठा जपली. मात्र, तो पहिल्या तिघात येऊ शकला नाही. संयुक्तरीत्या १३ व्या स्थानावर राहिलेला आनंद अखेर २५ व्या स्थानावर आला. तीन दिवसांची ही स्पर्धा नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन याने जिंकली. पंधरा लढतींपैकी तो केवळ एकाच लढतीत अडचणीत आला होता. मात्र, तो हरला नाही. त्याने आठ विजय आणि सात अनिर्णित लढतींसह ११.५ गुणांसह प्रथम स्थान पटकावले. आनंदचे ९.५ गुण झाले. भारताचा युवा ग्रॅंडमास्टर विदित गुजराथी याचे ९ गुण झाले. तो एका क्रमांकाने आनंदच्या मागे राहिला.