Whats new

राष्ट्रपतींचे इस्रायली संसदेत शलोम-नमस्ते

President Pranav mukerjee

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी इस्रायलची संसद नेसेटमध्ये भाषण करून एक नवा इतिहास रचला आहे. भारत आणि इस्रायल यांनी आपले मैत्रीसंबंध कृषी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अधिक बळकट करण्याची गरज त्यांनी या भाषणातून प्रकर्षाने मांडली.

हिब्रूमध्ये नमस्काराला असणाऱ्या शलोम आणि भारतीय नमस्ते अशा दोन शब्दांनी भाषणाची सुरुवात करून राष्ट्रपतींनी उपस्थित संसद सदस्यांची मने जिंकली. आपल्या भाषणामध्ये मुखर्जी यांनी इस्रायलने शेती क्षेत्रात तंत्रज्ञानाद्वारे केलेल्या प्रगतीची वाहवा केली. भारत व इस्रायलने शेती व औद्योगिक क्षेत्रात एकत्र प्रयत्न करायला हवेत असेही सांगितले. २००० वर्षांपूर्वी ज्यू धर्मीय भारतामध्ये आले आणि भारतीय समाजात मिसळून समजाचा एक भाग बनून गेले याचा उल्लेखही त्यांनी केला. नेसेटमध्ये भाषण देणारे पहिले भारतीय राष्ट्रपती झाल्यामुळे आपण सन्मानित झालो आहोत असेही ते म्हणाले. मात्र, राष्ट्रपतींनी भाषणात पॅलेस्टाईनचा एकदाही उल्लेख केला नाही.