Whats new

डान्सबारवरील बंदी उठवली : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

suprime court

सरकारने मुंबईतील डान्सबारवर घालतेली बंदी अखेर सर्वोच्च न्यायालयाने उठविली. त्यामुळे मुंबईतील डान्सबार मालकांना पुन्हा सुगीचे दिवस येणार आहेत. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी 2005 साली आपल्या संपूर्ण राजकीय शक्तीचा वापर करून डान्सबारवर बंदी घालण्याचा आदेश आणला होता. या आदेशाविरोधात डान्सबार मालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होता. उच्च न्यायालयाने डान्सबार मालकांच्या बाजूने निर्णय देत डान्स बार सुरू ठेवण्याचा निर्णय दिला होता.

बंदी उठविल्यानंतर कायद्यात बदल करून महाराष्ट्र पोलीस ऍक्ट 33-अ हा बंदीचा नवा कायदा आणण्यात आला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने यास स्थगिती दिली होती. अखेर न्यायालयाने बंदी उठवत बार सुरू करण्यास मान्यता दिली आहे.