Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to www.allauddin.co.in

Allauddin

मंगळावर आहे गौतम बुद्ध यांचा पुतळा, एलियन हंटर्सने केला दावा

mars

एलियन हंटर्सच्या टीमने मंगळ ग्रहावर गौतम बुद्ध यांचा पुतळा असल्याचा दावा केला आहे. नासाच्या मार्स रोव्हरने पाठविलेल्या छायाचित्रांचा अभ्यास करुन हा दावा करण्यात आला आहे. एलियन हंटर्स टीमचे स्कॉट सी वॅरिंग यांनी सांगितले, की सूर्यमंडळातील या तांबड्या ग्रहावर जीवसृष्टी असल्याचा हा पुरावा आहे.
स्कॉट सी वॅरिंग यांनी सांगितले, की एलियनशी संबंधित कोणतीही माहिती नासाला जाहीर करायची नाही. त्यांना या बाबी लपवून ठेवायच्या आहेत. पण मार्स रोव्हरने पाठविलेल्या अनेक छायाचित्रांमध्ये हे सिद्ध झाले आहे, की मंगळावर जीवसृष्टी आहे. यापूर्वी मंगळावर पिरॅमिड सारखी आकृती दिसल्याचा दावा करण्यात आला होता.