Whats new

'कॉल ड्रॉप' झाल्यास आता रुपयाची भरपाई

call-drop

कॉल ड्रॉपची समस्या वारंवार होत असल्याने सरकारने याबाबत कठोर धोरण स्वीकारले असून, खराब सेवा देणा-या कंपन्यांना आता कॉल ड्रॉप झाल्यास दुप्पट दंड द्यावा लागणार आहे. याबाबत नवे नियम जारी करण्यात आले आहेत. कंपन्यांनी कोणत्याही नियमाचे पालन न केल्यास त्यांच्याकडून एक लाख रुपयाचा दंड आकाराण्यात येईल. यासाठी सुरुवातीला 50 हजार रुपये दंड आकारण्यात येत होता. मात्र, मागील काही महिन्यामध्ये कॉल ड्रॉपमध्ये घट होण्याऐवजी त्यामध्ये दुपटीने वाढ झाल्याने ट्रायने चिंता व्यक्त केली आहे.

कंपन्या देत असलेल्या सेवेबाबत जवळपास 15 मानके तयार करण्यात आली आहेत. याला तांत्रिक आणि ग्राहक सेवा या श्रेणीमध्ये विभागण्यात आले आहे. कॉल ड्रॉपची समस्या तांत्रिक श्रेणीमध्ये येते. यामुळे जर एखाद्या कंपनीने जर दोन किंवा अधिक जास्त वेळा तांत्रिक सेवेमध्ये मानक पूर्ण न केल्यास 50 हजार दंड आकारण्यात येईल. त्यांनतर जर मानके पूर्ण केली नाहीत तर प्रत्येक तीन महिन्याला दंड म्हणून दोन लाख रुपये वसूल करण्यात येतील. जर कंपनी तिमाहीमध्ये काही मानके पूर्ण करू शकली तर त्यांचा दंड पुन्हा एक लाख करण्यात येईल. या नियमांमुळे मोबाईल धारकांना उत्तम सेवा मिळेल, असे ट्रायने म्हटले आहे.