Whats new

सत्यार्थीना हॉवर्ड विद्यापीठाचा पुरस्कार जाहीर

kailash

नोबेल पुरस्कार विजेता कैलास सत्यार्थी यांना जगप्रसिद्ध हॉवर्ड विद्यापीठाच्यावतीने यंदाचा ‘मानवतावादी पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळविणारे सत्यार्थी हे पहिले भारतीय ठरले आहेत. बालहक्कांसाठी लढणारे व शांततेचे नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांना हार्वर्ड विद्यापीठातर्फे वर्षातील सर्वोत्तम मानवतावादी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

जगभरातील प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी एक असलेल्या हॉर्वर्ड विद्यापीठातर्फे दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. मानवी हक्कांची पायमल्ली न होऊ देता जीवनाचा स्तर वाढविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नागरिकाला हा पुरस्कार देण्यात येतो. यंदा या पुरस्कारासाठी सत्यार्थी यांची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार मिळविणारे सत्यार्थी हे पहिले भारतीय नागरिक आहेत. बालकामगार व बाल हक्कांसाठी मोलाचे काम करणाऱ्या कैलाश सत्यार्थी यांना यंदाचा मानवतावादी पुरस्कार देण्यात येत असल्याचे, विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले. .