Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

नाट्यसंमेलनाचे गवाणकर अध्यक्ष

natyasamelan

मराठी रंगभूमीवर इतिहास घडवणाऱ्या आणि मालवणी बोली सातासमुद्रापार नेणाऱ्या ‘वस्त्रहरण’ नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर यांची ९६ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. गवाणकर यांच्यासाठी अमृतमहोत्सव आणि नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद, असा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे.

९६ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी प्रेमानंद गज्वी, गंगाराम गवाणकर, विश्वास मेहेंदळे आणि श्रीनिवास भणगे यांची नावे चर्चेत होती. नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाची बैठक माटुंग्यातील यशवंत नाट्यमंदिरात झाली. या बैठकीत गवाणकर यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब झाले. गवाणकर यांनी आपल्या प्रदीर्घ नाट्यसेवेत मालवणी बोलीतील अनेक नाटके रंगभूमीवर आणली. त्यांच्या ‘वस्त्रहरण’ नाटकाचे पाच हजारांहून अधिक प्रयोग झाले.

गंगाराम म. गवाणकर :

जन्मगाव - माडबन, ता. राजापूर, जि. रत्नागिरी

प्राथमिक शिक्षण - माडबन

माध्यमिक शिक्षण - माझगाव नाईट हायस्कूल, डोंगरी (मुंबई) महाविद्यालयीन शिक्षण - सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबईव्यावसायिक रंगमंचावरील नाटके -

वेडी माणसे, दोघी, वस्त्रहरण, प्रीतीगंध, चित्रागंदा, वन रूम किचन, वात्रट मेले, वर भेटू नका, पोलिस तपास चालू आहे, वर परीक्षा, अरे बाप रे, महानायक, वडाची साल पिंपळाक, भोळा डांबिस, मेलो डोळो मारून गेलो.

- वस्त्रहरण 5400 प्रयोग - वात्रट मेले 2500 प्रयोग - वन रूम किचन 100 प्रयोग

1972 पासून आकाशवाणी व दूरदर्शनवर अनेक सदरातून लेखन, 10 दूरदर्शन मालिका आणि सहा मराठी चित्रपटांचे लेखन

1984 मध्ये वस्त्रहरण या मालवणी नाटकाचे ब्रिटिश रंगभूमीवर पदार्पण

मिळालेले पुरस्कार -

* अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे आचार्य अत्रे व गो. देवल नाट्य पुरस्कार * अखिल भारतीय नाट्य परिषद पुरस्कृत राज्य सरकारचा नाटककार राम गणेश गडकरी पुरस्कार * मुंबई मराठी साहित्य संघातर्फे प्रा. मधुकर अष्टीकर विनोदी नाटककाराचा पुरस्कार * एकता कला मंचतर्फे कला गौरव पुरस्कार * कोकण कला अकादमीतर्फे कोकण रत्नभूषण पुरस्कार * प्रबोधन कला मंचतर्फे जीवनगौरव पुरस्कार * अखिल भारतीय भंडारी समाजातर्फे साहित्य रत्नभूषण पुरस्कार * 2010 मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ नाट्यमहोत्सवात सात नाटकांची भारतातून निवड. त्यात महाराष्ट्रातून "वस्त्रहरण‘ या नाटकाची निवड * "व्हाया वस्त्रहरण‘ हे आत्मकथन प्रसिद्ध * वर्तमानपत्रातून सातत्याने स्तंभलेखन * झी टॉकीजचा 2015 चा जीवनगौरव पुरस्कार .