Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

ली झुरुई डेन्मार्क बॅडमिंटन स्पर्धेच्या जेती, सिंधूला उपजेतेपद

sindu

डेन्मार्क येथे झालेल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला अंतिम फेरीत भारताची स्टार खेळाडू पीव्ही सिंधूला चीनच्या ली झुरुईकडून पराभव स्वीकारावा लागला. सिंधूला पराभूत करत लीने सलग दुस-यांदा जेतेपदाला गवसणी घातली.

दुस-याच फेरीत सायनासह श्रीकांत, जयराम व अन्य खेळाडूं पराभूत झाले होते. एकमेव आशास्थान असणा-या सिंधूला मात्र अंतिम लढतीत चीनच्या लीने 47 मिनिटांत 21-19, 21-12 असे पराभूत करत जेतेपद पटकावले. अलीकडच्या काळात सततच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या सिंधूचे हे पहिलेच उपजेतेपद ठरले. आतापर्यंत दोघीत पाच लढती झाल्या आहेत. त्यातील तीन लढती लीने तर दोन लढतीत सिंधूने बाजी मारली होती.

पहिल्या गेममध्ये सिंधूने 16-11 अशी आघाडी घेतली होती. पण, लीने जोरदार पुनरागमन करतानना 17-17 अशी बरोबरी साधली. यानंतर पुढचे चार गुण वसूल करत पहिला गेम आपल्या नावे केला. दुस-या गेममध्येही लीने आपला धडाका कायम ठेवताना 21-12 असा जिंकला. जागतिक क्रमवारीत तेराव्या स्थानी असलेल्या सिंधूने लीला चांगलीच टक्कर दिली. विशेष म्हणजे, लीचे वर्षातील पहिलेच जेतेपद ठरले.