Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

बायचुंग भुतिया एआयएफएफचा सल्लागार

baiching-bhutiea

अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने माजी खेळाडू बायचुंग भुतियाला सल्लागारपदी नियुक्त केल्याचे फेडरेशनने जाहीर केले.
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या विविध लढतींत भारताची अतिशय सुमार दर्जाची कामगिरी झाल्याने संघाचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टन्टाईन यांच्यावर दडपण येऊ लागले होते. त्या पार्श्वभूमीवर फेडरेशनने भुतियाला सल्लागार म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या नियुक्तीमुळे कॉन्स्टन्टाईन यांच्यावरील भार थोडासा कमी होणार असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. भुतियादेखील त्यांचा खंदा समर्थकच आहे. ‘स्टीफन कॉन्स्टन्टाईन 2017 पर्यंतचा आपला करार निश्चितच पूर्ण करतील. तांत्रिक समितीचा अध्यक्ष व आता सल्लागार म्हणून मी तुम्हाला याची हमी देतो,’ असे भुतियाने सांगितले.
तांत्रिक समितीतील भूमिकेपेक्षा या भूमिकेतील वेगळेपणाबद्दल सांगताना भुतिया म्हणाले की, ‘तांत्रिक समितीत असताना प्रशिक्षक व तांत्रिक संचालक यांची नियुक्ती करणे एवढेच माझे काम असते. पण सल्लागार समितीत असताना मला कार्यकारिणी समितीच्या बैठकींना तसेच एआयएफएफच्या सर्व बैठकांना उपस्थित रहावे लागणार आहे. सर्व पैलूंचा विचार करून मला सल्ला देण्याची भूमिका पार पाडावी लागणार आहे. राज्य परवाना निकष यावर माझे पूर्ण लक्ष केंद्रित असेल. आम्ही ही प्रक्रिया लवकरच तयार करणार आहोत. राज्यांनी तळागाळातील स्तरावर काम करण्याची गरज आहे. सध्या अनेक राज्यांत त्यांची लीग स्पर्धाही नाही. याशिवाय दोन वर्षांत भारतात 17 वर्षांखालील वयोगटाची विश्वचषक स्पर्धा होणार आहे, त्यावरही काम करण्याची गरज आहे,’ असे त्याने स्पष्ट केले.
सध्या सुरू असलेल्या घडामोडीपेक्षा भविष्यावर लक्ष देण्याच्या गरजेवर त्याने भर दिला. ‘संघासाठी आखलेली कोणतीही योजना दीर्घकालीन असावी. प्रामाणिपणे सांगायचे तर पुढील दोन विश्वचषक स्पर्धांत आम्ही सहभागी होणार नाही. 17 वर्षांखालील गटाच्या विश्वचषकात भारताच्या कनिष्ठ संघाने चांगली कामगिरी केल्यास त्यांचे भवितव्य निश्चितच उज्ज्वल असेल आणि यावरच आम्हाला जास्त भर द्यायचा आहे. फारसा पाठिंबा मिळत नसल्याने सध्याच्या बॅचवर काम करणे तसे आता कठीण आहे,’ असे तो म्हणाला.