Whats new

कॅनडात लिबरल पक्षाचा ऐतिहासिक विजय

justin-trudeau

कॅनडामधील लिबरल पक्षाने येथील कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाची सुमारे दशकभराची सत्ता संपुष्टात आणत ऐतिहासिक विजय मिळविल्याचे स्पष्ट झाले. आधुनिक कॅनडाचे राष्ट्रपिता मानले जाणाऱ्या पीएर त्रुडेवु यांचे ज्येष्ठ पुत्र जस्टिन त्रुडेवु (वय 43) हे कॅनडाचे पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे.
कॅनडाचे सध्याचे पंतप्रधान स्टीफन हार्पर यांच्या आर्थिक व सांस्कृतिक धोरणाचा फटका कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षास बसल्याचे मानले जात आहे. या निवडणुकीसाठीची मतमोजणी अद्याप सुरु आहे. मात्र लिबरल पक्षाने 338 जागांपैकी किमान 174 जागांवर विजयी आघाडी घेतली आहे. त्रुडेवु यांचा हा विक्रमी विजय आहे. याआधी, कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाने 1984 मध्ये देशातील निवडणुकीमध्ये सर्वाधिक फरकाने विजय मिळविला होता.
लिबरल पक्षाची अवस्था वाईट असताना 2013 मध्ये त्रुडेवु यांनी हाती सूत्रे घेतली होती. विरोधकांकडून टीका होत असताना धाडसी प्रचारमोहिम राबवित त्रुडेवु यांनी विजय खेचून आणल्याचे मानले जात आहे. सीरियामधून येणारे निर्वासित आणि आर्थिक मंदी हे दोन मुद्दे कॅनडाच्या या निवडणुकीत विशेष महत्त्वपूर्ण होते.