Whats new

चॅलेंजर टेनिस स्पर्धेत साकेत विजेता

saket

भारताच्या साकेत मायनेनी याने एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळविले. अंतिम सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाच्या जॉर्डन थॉमसन याच्यावर ७-५, ६-३ अशी मात केली. साकेतला दुहेरीत उपविजेतेपद मिळाले. देशबांधव सनम सिंग त्याचा जोडीदार होता. ट्रीस्टन लॅमासीन (फ्रान्स)-नील्स लॅंगर (जर्मनी) यांनी साकेत-सनमला १-६, ६-३, १०-८ असे हरविले. एकेरीत साकेतने नवव्या गेममध्ये एक ब्रेकपॉइंट वाचविला. मग १२व्या गेममध्ये त्याने थॉमसनची सर्व्हिस भेदली. त्याने कोर्टलगत भेदक फटके मारले, तसेच नेटजवळ धाव घेतली. दुसऱ्या सेटच्या पाचव्या गेममध्ये सर्व्हिस खंडित झाल्याने साकेत २-३ असा मागे पडला होता. त्यानंतर साकेतने प्रतिआक्रमण रचले. त्याने सलग चार गेम जिंकले. सहाव्या आणि आठव्या गेममध्ये त्याने थॉमसनची सर्व्हिस भेदली. नवव्या गेममध्ये विजयासाठी त्याला सर्व्हिस राखण्याची गरज होती. त्या वेळी त्याने दोन ब्रेकपॉइंट वाचविले. सर्व्हिस राखत त्याने विजेतेपद नक्की केले.