Whats new

ज्योकोविक अव्वलस्थानी कायम

jokowich

अलीकडे जाहीर करण्यात आलेल्या ताज्या एटीपी क्रमवारीत सर्बियाच्या नोव्हॅक ज्योकोविकने आपले अव्वलस्थान कायम राखले. अलीकडेच झालेल्या चीन ओपन व शाघांय मास्टर्सचे जेतेपद ज्योकोविकने मिळवले होते. शाघांय मास्टर्सच्या जेतेपदासह ज्योकोविकने वर्षातील नववे तर कारकिर्दीतील 57 वे जेतेपद पटकावले. भारताच्या युकी भांब्रीने टॉप-100 मध्ये स्थान मिळवताना 99 वे स्थान पटकावले. शाघांय मास्टर्स उपजेतेपद पटकावणारा फ्रान्सचा विल्प्रेड सोंगाने पुन्हा एकदा टॉप-10 मध्ये प्रवेश केला. सोंगाने पाच स्थानाची प्रगती करताना दहाव्या स्थानी झेप घेतली आहे. ब्रिटनचा अँडी मरे दुस-या तर स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर तिस-या स्थानी कायम आहे. मायदेशी सहकारी वांवरिका चौथ्या स्थानी आहे.
भारताचा स्टार टेनिसपटू युकी भांब्रीला अलीकडच्या काळातील चांगल्या कामगिरीचा फायदा झाला असून तो आता 99 व्या स्थानी आहे. 2010 नंतर युकीच्या रुपाने एका भारतीय खेळाडूने टॉप-100 मध्ये प्रवेश केला आहे. अन्य भारतीय खेळाडूमध्ये साकेत मायनेनी (166), सोमदेव देववर्मन (181) व्या स्थानी आहे तर दुहेरीत रोहन बोपन्ना 15 व लियांडर पेस 36 व्या स्थानी विराजमान आहे.
एटीपी टेनिस क्रमवारी-
1. ज्योकोविक (सर्बिया)- 16,785 गुण
2. अँडी मरे (ग्रेट ब्रिटन)- 8750 गुण
3. रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड)- 8430 गुण.
4. स्टॅनिस्लास वांवरिका (स्वित्झर्लंड)- 6630 गुण.
5. टॉमस बर्डिच (झेक प्रजासत्ताक)- 4840 गुण.
6. केई निशीकोरी (जपान)- 4705 गुण.
7. राफेल नादाल (स्पेन)- 4330 गुण.
8. डेव्हिड फेरर (स्पेन)- 3805 गुण
9. मिलोस रॉनिक (कॅनडा)- 2820 गुण
10. विल्प्रेड त्सोंगा (फ्रान्स)- 2590 गुण.