Whats new

भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जपानचे सहकार्य

Bullet Train

भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जपानने 15 अब्ज डॉलर्सचे अर्थसाहाय्य देण्याचे मान्य केले आहे. या कर्जावर जपान अत्यंत कमी म्हणजे 1 टक्क्याहून कमी व्याज आकारणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाच्या एका अधिका-याने सांगितले. मुंबई-अहमदाबाद हा 505 किलोमीटरचा मार्ग बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे जोडला जाणार आहे.

मुंबई-दिल्ली या 1200 किलोमीटर मार्गाचे कंत्राट मिळविण्यात चीन यशस्वी ठरला होता. हे कंत्राट वेगवान गाडीसंबंधातील आहे. मात्र चीनकडून कर्जासाठी गुंतवणूक झालेली नाही. चिनविरोधात मोदींच्या महत्त्वाकांक्षी योजनेला मोठे कर्ज देण्याच्या निर्णयामुळे जपान पुढे जाणार असल्याचा रंग दिसत आहे. वेगवान गाडीच्या तंत्रज्ञानाबद्दल ब-याच देशांनी उत्सुकता दाखविली असली तरी तंत्रज्ञान आणि अर्थसाहाय्याबद्दल जपानचा एकमेव प्रस्ताव असल्याचे इंडियन रेल्वे बोर्डाचे चेअरमन व सदर प्रकल्पाचे व्यवस्थापक ए. के. मित्तल यांनी सांगितले. भारतातील प्रमुख व औद्योगिक शहरे दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता जोडून वैभवशाली 10 हजार किलोमीटरचा चतुष्कोन हे दोन प्रकल्प पूर्ण करणार आहेत.

डबे, इंजिने यासारखी रेलसामग्री जपानी कारखान्यांकडून 30 टक्के घेण्याच्या अटीवर जपानने मुंबई-अहमदाबाद प्रकल्पासाठी 80 टक्के अर्थसाहाय्य देऊ केल्याची माहिती संबंधित अधिका-यांनी दिली. जपानच्या इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (जेआयसीए) या मार्गाची पाहणी केली असून या प्रकल्पपूर्तीनंतर सात तासांच्या प्रवासाला पाच तास लागणार आहेत. मात्र यासाठी असणा-या तंत्रज्ञानाला जपान अर्थसाहाय्य देणार असल्याने गुंतागुंत निर्माण झाली आहे. त्यासाठी जपानने तंत्रज्ञानाचे भारताला हस्तांतर करेल.