Whats new

चीनकडून कापसाच्या आयातीत घट

COTTONS

केंद्र सरकारला सलग दुस-या वर्षी शेतक-यांकडून मोठय़ा प्रमाणात कापूस खरेदी करावा लागणार आहे. कारण कापसाचा मोठा खरेदीदार असलेल्या चीनने कापसाच्या आयातीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. आयातीमध्ये घट झाल्याने कापसाच्या किमतीत घसरण पहावयास मिळत आहे.

30 सप्टेंबर रोजी संपलेल्या मार्केटिंग वर्षामध्ये महामंडळाने सरकारद्वारे किमान मूल्य (एमएसपी) वर 160 अब्ज रुपये खर्च करून 87 लाख टन कापसाची खरेदी केली. तर मागील वर्षी सीसीआयने 4 लाख टनची खरेदी केली होती. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष (सीएआय) धीरेन शेठ यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक पुरवठय़ाच्याबाबत कापसाची किंमत एमएसपीस्तरापेक्षा खाली जाणार आहे. चीनच्या मागणीत घट झाल्याने ही परिस्थिती उद्भावली आहे. शेतक-यांची मदत करण्याच्या उद्देशाने सरकारने खरेदी केल्यास, शेतक-यांना विदेशात स्वस्त दरात कापूस विक्री करण्याची आवश्यकता भासणार नाही.

मागील काही वर्षांपासून भारताच्या कापूस निर्यातीमध्ये निम्म्यापेक्षा अधिक भागीदारी चीनची होती. परिणामी विक्रमी उत्पादन होऊनही कापसाच्या किमतीत वाढ होऊ शकलेली नाही. मात्र, मागील वर्षी साठेबाजीला आळा घालण्यात आल्यामुळे कापसाच्या मागणीला चालना देण्यासाठी चीनने आयातीत कपात केली होती.