Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

लंडनमधील जागतिक विद्यार्थ्यांच्या क्रमवारीत भारत तिस-या स्थानी

INDIAN STUDENT IN AMERICA

चीन आणि अमेरिकेनंतर आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या जगतात भारताचा क्रमांक लंडनमध्ये तिस-या क्रमांकावर आहे. हे विद्यार्थी लंडन विद्यापीठामध्ये शिकत असून ते 3 अब्ज पौंड खर्च करत असल्याने ब्रिटिश अर्थव्यवस्थेला मोठय़ा प्रमाणात आधार देतात. तसेच त्यांच्यामुळे 37 हजार नोकऱया निर्माण झाल्या आहेत, अशी माहिती ‘लंडन अँड पार्टनर्स’ या अधिकृत कंपनीच्या अहवालाने दिली आहे.
चीनमधील विद्यार्थ्यांच्या 407 दशलक्ष पौंड आणि अमेरिकेतील विद्यार्थ्यांच्या 217 दशलक्ष पौंड खर्चाच्या तुलनेत भारतीय विद्यार्थ्यांच्या खर्चाची आकडेवारी 130 दशलक्ष पौंड आहे. भारतीय विद्यार्थ्यांनी 2013-14 मध्ये 43 टक्के (56 दशलक्ष पौंड) शैक्षणिक शुल्काच्या रूपात, 56 टक्के (74 दशलक्ष पौंड) उदरनिर्वाहाच्या रूपाने खर्च केले आहेत. 1 टक्क्याहून कमी रक्कम मित्रमंडळी आणि नातेवाईकांना भेटण्यासाठी त्यांच्याकडून खर्च झाल्याची माहिती आहे.
2009-10 पासून चिनी विद्यार्थ्यांत 49 टक्क्यांनी वाढ झाली असली तरी भारतातील विद्यार्थ्यांमध्ये घट झाली असून त्यांचे प्रमाण वर्षाला 11 टक्के कमी झाल्याचे ‘इकॉनॉमिक इम्पॅक्ट ऑफ लंडन्स इंटरनॅशनल स्टुडंट्स’च्या अहवालाने म्हटले आहे. ही घट पदव्युत्तर शिक्षणाला व्हिसा देण्याच्या नियमात बदल झाल्याने झाली असावी, असा अंदाज सदर अहवालाने केला आहे.
लंडनमधील जागतिक विद्यार्थ्यांच्या पहिल्या दहा देशांमध्ये इटली, जर्मनी, फ्रान्स, हाँगकाँग, ग्रीस, मलेशिया आणि नायजेरिया या देशांचा अग्रस्थानावर क्रमांक असल्याचे स्पष्ट झाले आहे. लंडनमधील जागतिक विद्यार्थ्यांच्या गर्दीबद्दल मत देताना लंडनचे महापौर बोरिस जॉन्सन यांनी असे सांगितले, की पृथ्वीवरील सर्वोत्तम विद्यापीठात आमच्या काही विद्यापीठांचा समावेश असून त्यामध्ये वैज्ञानिक संशोधनापासून संगीतकारापर्यंत शिक्षण मिळण्याची सोय आहे.