Whats new

1 जानेवारी 2016 पासून सरकारी नोक-यांमधील मुलाखती रद्द : पंतप्रधान

PM MODI

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13व्या वेळेस ‘मन की बात’मधून देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारी नोक-यांमधील ग्रुप बी, सी आणि डी संवर्गातील नोक-यांसाठी घेण्यात येणा-या मुलाखती रद्द करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. येत्या 1 जानेवारी 2016 पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही पंतप्रधानांनी या वेळी सांगितले.
सध्या सुरू असलेल्या सरकारी भरतीवर या निर्णयाचा कोणताही परिणाम होणार नाही. गरिब कुटुंबातील तरूणांना भ्रष्टाचारामुळे सरकारी नोक-या मिळवताना अडचणी येतात. छोटय़ा छोटय़ा नोक-यांसाठी त्यांना शिफारस मिळविताना अनेक कष्ट घ्यावे लागतात. दलाल मंडळी त्यांच्याकडून पैसे हडपतात. नोकरी मिळो अथवा न मिळो त्याला पैसे खर्च करावेच लागतात.
हा सर्व प्रकार कानावर आल्यानंतर सरकारी भरती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले. ‘स्वच्छ भारत’ अभियानासाठी त्यांनी माध्यमांना धन्यवाद दिले. पंतप्रधान मोदी यांची 13 वी ‘मन की बात’ होती.