Whats new

कुझेनत्सोव्हाकडे क्रेमलीन चषक

Svetlana-Kuznetsova

रशियाच्या स्वेतलाना कुझेनत्सोहाने आपल्याच देशाच्या ऍनेस्टेसिया पॅव्हेलचेंकोव्हाचा 6-2, 6-1 अशा सरळ सेटसमध्ये फडशा पाडून क्रेमलीन चषक महिलांच्या टेनिस स्पर्धेत एकेरीचे विजेतेपद मिळविले. कुझेनत्सोव्हाने तब्बल 14 महिन्यांनंतर डब्ल्युटीए टूरवरील आपले पहिले विजेतेपद मिळविले आहे. तिने हा अंतिम सामना 80 मिनिटात जिंकला. कुझेनत्सोव्हाने या लढतीतील पहिला सेट 40 मिनिटात तर दुसरा सेट तितक्याच कालावधीत जिंकला.