Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

थ्रीडी प्रिंटर'द्वारे तयार झाल्या रक्तवाहिन्या

blood vessel

चीनमधील कंपनीने बायो-प्रिंटरच्या माध्यमातून थ्रीडी रक्तवाहिन्या यशस्वीरित्या तयार केल्या आहे. तसेच यामुळे मानवी अवयव तयार करता येऊ शकतील अशी शक्यताही कंपनीने वर्तविली आहे. सिचुआन प्रांतातील चेंगडू येथील सिचुआन रिव्होटेक कंपनीने स्वत: तयार केलेल्या बायो-इंक तंत्रज्ञानाद्वारे रक्तवाहिन्या तयार केल्या आहेत. त्यासाठी थ्रीडी प्रिंटरची मदत घेण्यात आली आहे. अशा प्रकारच्या अभूतपूर्व थ्रीडी रक्तवाहिन्या तयार केल्यामुळे आपण एक नवा आविष्कार केल्याचा दावाही कंपनीने केला आहे. या रक्तवाहिन्या एखाद्या अवयवाला आवश्यक त्या पोषकसत्वाची वाहतूक करू शकतील, अशी माहिती या प्रकल्पावर काम करणारे जेम्स कांग यांनी म्हटले आहे. रक्तवाहिन्या तयार करण्यासाठी कांग यांच्या टीमने बायो-इंकची निर्मिती केली आहे. एखाद्या अवयवाला पुनरुज्जीवन देण्यासाठी त्या उपयुक्त ठरतील.