Whats new

वनस्पतीयुक्त पाच रुपयांची गोळी मधुमेहाशी लढणार

DAIBETIES TABELET

टाइप टू डायबिटीज असणा-यांना पाच रुपयांची एक संशोधित गोळी लाभदायक ठरणार आहे. लखनौमधील ‘काऊन्सिल ऑफ सायन्टिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च’ (सीएसआयआर) या प्रयोगशाळेने जडीबुटीपासून बनवण्यात आलेले औषध बाजारपेठेत आणले आहे. त्या गोळीचे नाव ‘बीजीआर-34’ आहे. ‘नॅशनल बॉटनिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट’ (एनबीआरआर) आणि ‘सेंट्रल इन्स्टिटय़ूट फॉर मेडिसिनल अँड एरोमेटिक प्लांट’ (सीआयएमएपी) च्या मदतीने हे औषध सीएसआयआरने विकसित केले आहे. आपल्या 62 व्या जयंतीनिमित्त एनबीआरआयने हे औषध मधुमेही रुग्णांना उपलब्ध करून दिले आहे.

बीजीआर-34 मधुमेहाबरोबर रुग्णाच्या यकृत आणि किडनीचे कार्यसुद्धा व्यवस्थित करेल. जन्मापासून मधुमेह ज्यांना नसतो अशा टाईप-2 या मधुमेही रुग्णांसाठी हे औषध असून ते मधुमेहाच्या तक्रारी दूर करणारे आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे औषध साईडइफेक्ट्सपासून मुक्त आहे. टाईप-2 मधुमेहात रुग्णाच्या शरीरात इन्शुलिनची निर्मिती अत्यंत कमी होत असल्याने शरीर त्याचा वापर करू शकत नाही.