Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

फेररचे वर्षातील पाचवे जेतेपद

devid ferrer

आठव्या मानांकित स्पेनच्या डेव्हिड फेररने कारकिर्दीतील 26 वे जेतेपद मिळविताना एर्स्ट बँक ओपन स्पर्धा जिंकली. अंतिम फेरीत त्याने अमेरिकेच्या स्टीव्ह जॉन्सनचा 4-6, 6-4, 7-5 असा पराभव केला. या मोसमातील त्याचे हे पाचवे जेतेपद आहे. याआधी त्याने दोहा, रिओ डी जानेरो, ऍकापुल्को, कौलालंपूर येथील स्पर्धा जिंकल्या आहेत. या जेतेपदामुळे पुढील महिन्यात लंडनमध्ये होणा-या एटीपी अंतिम स्पर्धेतील त्याचे स्थानही निश्चित झाले आहे. 47 व्या मानांकित जॉन्सनची अंतिम फेरीत खेळण्याची ही पहिलीच वेळ होती. निर्णायक सेटमध्ये 5-4 अशी आघाडी घेतली होती. पण फेररने शेवटचे तीन गेम जिंकत जेतेपद पटकावले.