Whats new

आशियातील सर्वांत श्रीमंत गाव आहे गुजरातमध्ये, नावे 2200 कोटी रुपयांचे बॅंक डिपॉझिट

GUJRAT GOAN

गुजरातमधील एक गाव केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही प्रसिद्ध आहे. या गावात शहरांसारख्या पायाभुत सुविधा असून ग्रामस्थ आर्थिकदृष्या अतिशय संपन्न आहेत. गुजरातच्या भुजपासून सुमारे 3 किलोमीटर दूर अंतरावर पटेल समाजाचे वर्चस्व असलेल्या या गावाचे नाव माधापर असे आहे. या गावातील लोकांकडे तब्बल 2200 कोटी रुपयांचे बॅंक डिपॉझिट आहे.

या गावातील अनेक तरुण विदेशात नोकरी करतात. दरवर्षी ते कोट्यवधी रुपये या बॅंकांमध्ये जमा करतात. या एकट्या गावात 15 पेक्षा जास्त बॅंका आहेत. एवढ्या संख्येने बॅंका गावात असणारे माधापर आशियातील एकमेव गाव आहे. या गावाची लोकसंख्या 40 हजार आहे. सरासरी काढली तर गावातील प्रत्येक व्यक्तीच्या नावे 6 लाख रुपये डिपॉझिट आहे. गावाचे जीडीपी 7,20,000 रुपये आहे. या गावातील सुमारे पाच हजार लोक विदेशात नोकरी करतात. यातील बहुतेक लोक आफ्रिकन देशांमध्ये राहतात.

गुजरातमधील पॅरिस या नावाने ओळखले जाणाऱ्या आणंद जिल्ह्यातील धर्मज गाव श्रीमंतीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर येते. 11 हजार लोकसंख्या असलेल्या या गावातील बॅंकांमध्ये 1500 कोटी रुपये डिपॉझिट आहे. या गावात शाळा, कॉलेजेस सारख्या शिक्षणाच्या सर्व सुविधा आहेत. या गावात तरुणांसाठी जिमही सुरु करण्यात आली आहे.