Whats new

भारताचे वनडेतील दुसरे स्थान कायम

ICC- Ranking

भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका गमविली असली तरी भारताने आयसीसी वनडे क्रमवारीतील दुसरे स्थान कायम राखले आहे. स्टार फलंदाज विराट कोहलीने एका स्थानाची प्रगती करीत दुसरे स्थान मिळविले आहे.

दक्षिण आफ्रिकेने तिसरे स्थान कायम राखले. पण भारताचे दोन गुण कमी करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. या मालिकेआधी द.आफ्रिकेचे 110 गुण होते आणि ते भारतापेक्षा पाच गुणांनी मागे होते. झिम्बाब्वेने मायदेशातील मालिकेत 2-3 असा पराभव स्वीकारला असला तरी त्यांनी दहावे स्थान कायम राखले आहे. ते आयर्लंडपेक्षा किंचित पुढे आहेत. झिम्बाब्वेवर ऐतिहासिक मालिका विजय मिळविणाऱया अफगाणिस्तानने आयर्लंडपेक्षा एका गुणाने मागे आहे.

भारतातील मालिकेत द.आफ्रिकन फलंदाजांनी चांगले प्रदर्शन केल्यामुळे फलंदाजांच्या क्रमवारीत काही बदल झाले असून द.आफ्रिकेच्या अनेक फलंदाजांना बढती मिळाली आहे. कर्णधार डी व्हिलियर्सने अग्रस्थान कायम राखले असून दुस-या स्थानावरील कोहलीपेक्षा ते 96 गुणांनी पुढे आहे. गेल्या पाच सामन्यांत त्याने तीन शतके (नाबाद 104, 112, 119) फटकावली आहेत. हाशिम आमलाचे स्थान तीन स्थानांनी घसरले असून तो आता पाचव्या स्थानावर आहे. भारतीय कर्णधार धोनीने दोन स्थानांची प्रगती केली असून तो आता सहाव्या स्थानावर आहे. शिखर धवनपेक्षा तो 11 गुणांनी पुढे आहे.