Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

दारू, तंबाखूवर जीएसटीमध्ये अतिरिक्त कर

SIN TAX

प्रस्तावित जीएसटी विधेयकानुसार दारू आणि तंबाखू, सिगारेट सारख्या हानीकारक वस्तू तयार करणा-या उद्योगांना अतिरिक्त कर द्यावा लागणार आहे. जीएसटी विधेयकानुसार, संपूर्ण देशात एकसमान कर प्रणाली असणार आहे.

अर्थ मंत्रालयाच्या ने दिलेल्या माहितीनुसार, दारू आणि तंबाखूसह शरीरासाठी हानीकारक असणा-या उद्योगांसाठी अतिरिक्त कर आकारण्याबाबत तरदूत करण्यात आली आहे. या उत्पादनांवर किती प्रमाणात कर आकारण्यात येईल याची माहिती मात्र देण्यात आलेली नाही.

अपायकारक उत्पादने निर्माण करणा-यां कंपन्यांकडून जगभरात मोठय़ा प्रमाणात कर अतिरिक्त कर आकारला जातो. जास्तीत जास्त कर लावल्याने या उत्पादनांच्या किंमतीमध्ये वाढ होते. परिणामी लोक अशी उत्पादने खरेदी करण्यापासून परावृत्त होतात. तसेच या उत्पादनांवर अतिरिक्त कर लावल्याने केंद्र सरकारकडे मोठय़ा प्रमाणात महसूल जमा होत असतो. नागरिकही या अतिरिक्त करास विरोध करत नाहीत. कारण या उत्पादनांचा वापर करणा-यांच्यावरच या अतिरिक्त करांचा परिणाम होतो. अर्थ मंत्रालय सध्या उद्योग क्षेत्राकडून जीएसटी विधेयकाबाबत विविध सूचना घेत आहे.

यामुळे प्रत्येकाला चर्चेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळत आहे. तसेच जीएसटीबाबत असणारे अनेक गैरसमज दूर होण्यास मदत मिळत आहे. सध्या आम्ही टिप्पण्या आणि सूचना याबाबत विचार करत असून, त्यानुसार विधेयकामध्ये योग्य ते बदल करण्यात येत आहेत. या बदलानंतर अंतिम अहवाल सादर करण्यात येणार आहे.