Whats new

अंतराळ कचऱ्यातील तुकडा पृथ्वीच्या दिशेने

earth

अंतराळ कचऱ्यातील तुकडा पृथ्वीवर आदळणार असून या घटनेबाबत भीतीयुक्त औत्सुक्य निर्माण झाले आहे. अपोलो अंतराळ मोहिमेच्या काळातील किंवा अलीकडील चांद्रमोहिमेदरम्यानच्या असू शकणाऱ्या या मानवनिर्मित तुकड्याचे ‘डब्ल्यूटी११९०एफ’ असे नामकरण करण्यात आले आहे. तथापि ‘डब्ल्यूचीएफ’ या टोपणनावाने तो ओळखला जातो. ‘डब्ल्यूचीएफ’ १३ नोव्हेंबरला सकाळी सहा वाजून १५ मिनिटांनी पृथ्वीवर कोसळेल, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. हा तुकडा पोकळ असून तो रॉकेटचा वापर झालेला भाग किंवा अलीकडील चांद्र मोहिमेचे ‘पॅनेलिंग शेड’ असू शकतो. भविष्यात अवकाशातून एखादी विध्वंसक वस्तू पृथ्वीवर आदळणार असेल तर काय करता येईल याची चाचणी म्हणून या घटनेचा शास्त्रज्ञ अभ्यास करीत आहेत. या तुकड्यावर हवाई विद्यापीठाच्या दुर्बिणीतून नजर ठेवली जात आहे. या तुकड्याचा व्यास एक ते दोन मीटर असून तो श्रीलंकेच्या दक्षिण टोकापासून ४० मैल अंतरावर हिंद महासागरात कोसळण्याची शक्यता आहे. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर हा तुकडा जळून जाणे अपेक्षित आहे; मात्र तसे न झाल्यास त्याचे उर्वरित अवशेष बॉम्बसारखे आदळू शकतात, असे शास्त्रज्ञांनी सांगितले..