Whats new

‘इज ऑफ डुइंग बिझनेस’च्या यादीत भारत १३० व्या स्थानी

modi

जागतिक बँकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या २०१५ च्या "इज ऑफ डुइंग बिझनेस' यादीत भारताने १२ अंकांनी सुधारणा केली. एकूण १८९ देशांच्या या यादीत भारताचा १३० वा क्रमांक लागतो. गेल्या वर्षी या यादीत भारताचा १४२ वा क्रमांक होता. जागतिक बँकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या या अहवालानुसार २००४ मध्ये भारतात व्यवसाय सुरू करण्यासाठी १२७ दिवस लागत होते. आता २९ दिवस लागतात. यासाठी १३ प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. कंपनीसाठी वीज कनेक्शन घेणेदेखील सोपे झाले आहे. कर्जवसुली ट्रिब्यूनलमुळे अडकलेले कर्ज (एनपीए) २८ टक्क्यांनी कमी झाले आहे. मोठे कर्ज स्वस्त झाले आहे. असे असले तरी करप्रणाली अजूनही व्यवसाय करण्यासाठीच्या रस्त्यातली मोठी अडचण आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेवर भारताचा परिणाम : क्लॅरोस : विश्व बँक ग्लोबल इंडिकेटर्स ग्रुपचे संचालक लोपेझ क्लॅरोस यांनी सांगितले की, ‘सुधारण्याची प्रक्रिया सुरूच राहिली तर येणाऱ्या काही वर्षांमध्येच क्रमवारीत मोठी सुधारणा दिसू शकते. भारतात तेजीने विकास करण्याची क्षमता आहे, डेमोग्राफी त्यांच्या बाजूने आहे. काही अडचणी दूर केल्यास मोठे परिणाम दिसून येतील. भारत एक विशाल अर्थव्यवस्था आहे. त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर देखील होईल.'

जीएसटीमुळे बदल घडेल : जीएसटी पुढील वर्षी लागू झाल्यास मोठा बदल घडेल. सध्या कोणताही ट्रक सामान घेऊन गेल्यास त्याचा ६० टक्के वेळ हा एका जागी उभा राहूनच जातो. असे चेक पोस्ट, कागदपत्रांची पूर्तता, कर आणि लेव्ही यांची भरपाई करण्यासाठी लागणाऱ्या वेळेमुळे होते. जीएसटी लागू झाल्यानंतर कोणताच चेक पोस्ट राहणार नाही. सर्व कर एकाच जागी भरावे लागतील.

टॉप १० देश-

सिंगापूर, न्यूझीलंड, डेन्मार्क, द. कोरिया, हाँगकाँग, ब्रिटन, अमेरिका, स्वीडन, नॉर्वे आणि फिनलंड. चीनचीदेखील क्रमवारी ९० ने सुधारली असून आता चीन ८४ व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान १३९ व्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी पाकिस्तान १२८ व्या क्रमांकावर होता. /p>