Whats new

बँक ऑफ महाराष्ट्र, अभ्युदय बँकेला बँकिंग तंत्रज्ञान उत्कृष्टतेचे पुरस्कार

bank-of-maha-rajan-wawrd

रिझव्र्ह बँकेच्या आयडीआरबीटी (बँकिंग तंत्रज्ञान विकास आणि संशोधन संस्था) संस्थेकडून हैदराबाद येथे आयोजित ‘११ व्या बँकिंग तंत्रज्ञान श्रेष्ठता पुरस्कार’ सोहळ्यामध्ये मध्यम आकाराच्या बँकांच्या वर्गवारीत बँक ऑफ महाराष्ट्रला तर सहकारी बँकांच्या वर्गवारीत अभ्युदय बँकेला सवरेत्कृष्ट बँकेचा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

बँक ऑफ महाराष्ट्रने ‘घोटाळे प्रतिबंधक आणि थकीत कर्ज व्यवस्थापन प्रणाली’ तसेच सर्वोत्तम ‘माहिती आणि तंत्रज्ञान व्यवस्थापन पायाभूत सुविधा’ या दोन श्रेणीमध्ये आणि मध्यम आकारातील ‘उत्कृष्ठ बँके’चा प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक आर. आत्माराम यांनी तो स्वीकारला. आयडीआरबीटीचे संचालक याप्रसंगी उपस्थित होते.

अभ्युदय सहकारी बँकेला ‘सर्वोत्तम माहिती-तंत्रज्ञान प्रणालीने समर्थ बँक’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अभ्युदय बँकेने माहिती-तंत्रज्ञानाच्या आधारे सेवा गुणवत्तेत निरंतर बदल केले आहेत. मोबाईल बँकिंग, एसएमएस बँकिंग, इंटरनेट बँकिंग, रूपे डेबीट कार्ड अशा आधुनिक सुविधा बँकेने तीन राज्यांमध्ये फैलावलेल्या आपल्या १८.०५ लाख खातेदारांना प्रदान केल्या आहेत.