Whats new

आफ्रिकी देशांना १० अब्ज डॉलरचे स्वस्त दरातील कर्ज

INDIA-SOUTH AFRICA

भारत आणि आफ्रिका यांच्यात दृढ आर्थिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी भारताने मोठा पुढाकार घेतला आहे. येथे सुरू असणा-या भारत-आफ्रिका परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आफ्रिकेसाठी 1 हजार कोटी डॉलर्स अर्थात सुमारे 64 जार कोटी रूपयांच्या सुलभ कर्जाची घोषणा केली आहे. यापैकी 10 कोटी डॉलरचा भारत-आफ्रिका विकास निधी असणार आहे. तसेच 1 कोटी डॉलर भारत-आफ्रिका आरोग्य निधीसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यापूर्वी भारताने वर्ष 2008 मध्ये ‘भारत-आफ्रिका परिषदे’त आफ्रिकेला 740 कोटी डॉलरचे सुलभ व्याज दरात कर्ज आणि 1.2 अब्ज डॉलरची मदतही जाहीर केली होती. भारत आणि आफ्रिका या दोन्ही जागतिक स्तरावरील नव्या अर्थव्यवस्था आहेत. भारत आफ्रिकेत संरक्षण, पायाभूत सुविधा, वीज, औद्योगिक, सिंचन, माहितीतंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रे विकसित करण्यासाटी सहाय्य करणार आहे. स्वच्छ ऊर्जा, वाहतूक, जलवायू आणि कृषी क्षेत्रातही सहकार्य होणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

गुंतवणुकीसाठी आफ्रिकेत उत्तम संधी-भारत- मागील एका दशकापेक्षा कमी कालावधीत भारत आणि आफ्रिकन देशांमधील व्यापारात दुप्पट वृद्धी झाली असून तो 70 अब्ज डॉलरच्या पुढे गेला आहे. भारत आणि आफ्रिकन देशांमध्ये युवा वर्ग मुबलक प्रमाणात असल्याने आर्थिक प्रगती करण्याची हीच सुवर्णसंधी होय. यामुळे देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यास मदत होईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

ही परिषद केवळ भारत आणि आफ्रिका यांची नसून जगातील एक तृतीयांश लोक एकाच ठिकाणी एकत्र आले आहेत. भारत आणि आफ्रिकन संस्कृतींमध्ये बरीचशी समानता आहे. यावेळी 34 आफ्रिकन देशांना भारतीय बाजारपेठेत करमुक्त करण्यात आले असून याचा भारतीय अर्थव्यवस्थेला फायदा होईल, असेही पंतप्रधान मोदी यांनी मत व्यक्त केले.

भारत-आफ्रिका परिषदेतील ठळक वैशिष्टय़े-
- पहिल्यांदाच या परिषदेत 54 आफ्रिकन देशांनी सहभाग दर्शविला
- वर्ष 2008 नवी दिल्लीतमध्ये पार पडलेल्या परिषदेत केवळ 14 देशांनी सहभाग घेतला होता. इजिप्त आणि लीबिया हे देश सहभागी झाले नव्हते.
- 2011 मध्ये इथोपियाची राजधानी अदिस अबाबामध्ये झालेल्या दुस-या परिषदेत केवळ 15 आफ्रिकन देशांनी सहभाग घेतला होता.
- चालू परिषदेत 41 आफ्रिकन देशांच्या प्रमुखांनी उपस्थिती जाहीर केली होती.
- 1983 च्या ‘नाम’ आणि ‘राष्ट्रकुल’ नंतर भारतात होणारा सर्वात मोठा कार्यक्रम आहे.
सध्या भारत आणि आफ्रिकन देशांमधील व्यापार 75 अब्ज डॉलरचा असून मागील चार वर्षात भारताने या देशांमध्ये अनेक प्रकल्प उभारले आहेत. या दरम्यान 41 आफ्रिकन देशांमध्ये 137 प्रकल्प सुरू केलेत.