Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

15 वर्षांत भारताच्या संपत्तीत 211 टक्क्यांनी वाढ

LAND-PROPERTY

गेल्या 15 वर्षांमध्ये भारताच्या संपत्तीमध्ये 211 टक्के वाढ झाल्याची आनंददायक बाब समोर आली आहे. ही वाढ अमेरिका, ग्रेट ब्रिटन, जपान, फ्रान्स, जर्मनी आणि ब्राझील या देशांपेक्षा जास्त आहे. नवीन जागतिक संपत्ती अहवालामध्ये भारताने पाचवे स्थान पटकावले आहे. इंडोनेशिया, चीन, रशिया आणि ऑस्टेलिया हे फक्त चार देश भारतापुढे आहेत. इंडोनेशिया या यादीमध्ये सर्वात प्रथम स्थानी असून तब्बल 362 टक्के वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे. चीनच्या संपत्तीमध्ये 341 टक्के, रशिया 253 तर ऑस्ट्रेलियाच्या संपत्तीमध्ये 248 टक्के वाढ झाली आहे.

अनेक पाश्चात्य देशांमध्ये ही वाढ समाधानकारक झाली नसल्याचे समोर आले आहे. यामध्ये जपान, अमेरिका आणि ग्रेट ब्रिटनसारख्या विकसित देशांचा समावेश आहे. जपानच्या संपत्तीमध्ये फक्त 39 टक्के, अमेरिका 41, तर गेट ब्रिटनच्या संपत्तीमध्ये 58 टक्के वाढ झाली आहे.

2000 मध्ये सर्वसाधारणपणे एका भारतीयाची संपत्ती 900 डॉलरइतकी होती. 2015 मध्ये यात वाढ होत ती 2,800 डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. एकूण वैयक्तिक संपत्तीनुसार, भारत आता जगातील 10 वा श्रीमंत देश आहे. एकूण वैयक्तिक संपत्ती म्हणजे देशातील नागरिकांच्या मालकीची असणा-या संपत्तीची सरासरी होय. मात्र प्रति व्यक्ती संपत्तीनुसार गणना केल्यास 20 देशांच्या यादीमध्ये भारत शेवटच्या स्थानी आहे. नवीन जागतिक संपत्तीच्या अहवालानुसार प्रति व्यक्ती संपत्तीच्या 20 देशांच्या यादीमध्ये स्वित्झर्लंड प्रथम स्थानी असून त्या देशामध्ये सर्वसाधारणपणे एका व्यक्तीची संपत्ती 2,85,100 डॉलर(1,88,16,600 रुपये), ऑस्टेलिया 2,04,400 डॉलर(1,34,90,400 रुपये), अमेरिका 1,50,600(99,39,600 रुपये) तर गेट ब्रिटनमध्ये 1,47,600 डॉलर(97,41,600 रुपये) आहे.

श्रीमंताच्या संख्येतही झपाटय़ाने वाढ- अहवालानुसार भारतातील पुणे शहराचा विकास झपाटय़ाने होत आहे. आशिया पॅसिफिकमधील सर्वात झपाटय़ाने विकास होणा-या 20 शहरांमध्ये आणि सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींमध्ये पुणे सातव्या स्थानी होते. शहरातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीची संख्या 2004 आणि 2014 दरम्यान 317 टक्क्याने वाढली आहे. 2004 मध्ये सर्वात श्रीमंत व्यक्तींची संख्या 60 होती. ती 2014 मध्ये 250 वर पोहोचली आहे. नव्या अहवालानुसार आशिया पॅसिफिक भागामध्ये सर्वाधिक वेगाने श्रीमंताची वाढ होणाऱया शहरामध्ये पुणे तिस-या स्थानी आहे. व्हिएतनाममधील हो ची मिन्ह शहर प्रथम स्थानी असून शहराची 400 टक्क्यांनी (40 पासून 200) वाढ होत आहे. तर जकार्ताची 396 टक्क्यांनी (280 पासून 1390) विकास होत आहे.

यादीमध्ये मुंबई शहर चौथ्या स्थानी असून शहरातील श्रीमंतांची वाढ 220 टक्क्यांनी होत आहे. 2004 मध्ये शहरामध्ये 840 कोटय़वधी होते, तर आता 2014 मध्ये त्यांची संख्या 2690 वर पोहोचली. हैदराबाद शहराने पाचवे स्थान पटकावले असून सध्या 510 कोटय़वधी (219 टक्के वाढ) आहेत. राजधानी दिल्लीमध्ये 2004 साली 430 कोटय़वधी होते, त्यांची संख्या 2014 मध्ये 1,350 वर पोहोचली. ही वाढ 214 टक्क्यांनी झाली.