Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

‘सौदी’त महिलांना निवडणूक लढविण्यास मान्यता

SAUDI-WOMEN  

रूढीवादी परंपरेच्या पडद्याआड आयुष्य जगणा-या सौदी अरबमधील महिलांच्या जीवनात क्रांतीची नवी पहाट उगवली आहे. सतत बुरख्या आड वावरणा-या व अन्य राष्ट्रांतील महिलांच्या तुलनेत व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी सहन करणा-या सौदी अरबमधील महिलांना आता निवडणूक लढविण्यासाठी सरकारने मंजुरी दिली आहे. सौदी अरबच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याचे पहायला मिळणार आहे.
कट्टर रूढीवादी परंपरा मानणारा देश म्हणून सौदी अरबची ओळख आहे. डोक्यापासून पायापर्यंत बुरखा परिधान केल्याशिवाय घराबाहेर न पडणे, वाहन चालविणे, यात्रा, नोकरी आणि पासपोर्ट बाळगण्यास बंदी त्याचबरोबर स्वतःचे लग्नही घरातल्या पुरूषांच्या संमतीशिवाय करायचे नाही, असे अनेक कडक निर्बंध येथील महिलांवर लादण्यात आलेले आहेत. मात्र, सौदी अरबचे राजे दिवंगत अब्दुल्ला यांनी 2011 मध्ये येथील महिलांना मतदानाचा अधिकार बहाल केला होता. त्यानंतर त्यांना आता निवडणूक लढविण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.
सौदी अरब येथे 12 डिसेंबर रोजी सौदी अरबमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यासाठी जवळपास 200 महिला निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. महिलांना निवडणूक लढविण्यासाठी मंजुरी दिल्याबद्दल काहींनी समाधान व्यक्त केले असले तरी कट्टरपंथीय संघटनांनी या निणर्याला जोरदार विरोध दर्शविला आहे. महिलांच्या मतदानाचा व निवडणूक लढविण्याच्या अधिकाराविरोधात ट्विटरवर मोहिम सुरू केली आहे.