Whats new

शिख चालक ‘ऑस्ट्रेलियन ऑफ द डे’ साठी नामांकित

tejindar pal  

ऑस्ट्रेलियात बेघरांना जेवण देण्यासाठी भारतीय वंशाच्या एका शिख चालकाला ‘ऑस्ट्रेलियन ऑफ द डे’ सन्मानासाठी नामांकन मिळाले आहे. हा पुरस्कार असामान्य कार्य करणा-या ऑस्ट्रेलियन नागरिकाला मिळतो.
तेजिंदर पाल सिंग मागील 3 वर्षांपासून डार्विनमध्ये मोफत जेवण देत आहेत. त्यांनी महिन्याचा अखेरचा रविवार गरीब आणि बेघरांना जेवण भरविण्यासाठी राखून ठेवला आहे. शनिवारी रात्रीची आपली पाळी संपल्यानंतर तेजिंदर पाल सिंग बेघरांसाठीचे जेवण तयार करण्याच्या कामात गुंततात. सिंग रविवारी दुपारच्या जेवणात गरजूंना छोले, भात आणि कढी वाढतात. यासाठी ते आपल्या कमाईतून 30 किलो धान्य खरेदी करतात आणि आपल्या हाताने जेवण बनवतात. मी बेघरांसाठी काही करत आहे, ज्याद्वारे त्यांना काही शक्ती मिळेल आणि ते आनंदी होतील. माझा धर्म सांगतो की उत्पन्नाचा दहावा हिस्सा गरजू आणि गरीबांसाठी असावा असे सिंग यांनी सांगितले.
‘भुकेले आणि गरजू लोकांसाठी मोफत भारतीय जेवण’ असे त्यांच्या व्हॅनवर लिहिलेले आहे. सिंग यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. तसेच ते फक्त स्वतःच इच्छेच्या बळावर अनेक गरजूंची मदत करत आहेत. 35 वर्षांपासून कॉमनवेल्थ बँकेकडून प्रायोजित हा पुरस्कार असामान्य ऑस्टेलियन लोकांना सन्मानित करण्यासाठी दिला जातो.