Whats new

हजाराची नोट होणार अधिक सुरक्षित

ONE THOUSAND RUPEES रिझर्व्ह बँकेने नव्या सुरक्षा मानकांसह एक हजार रुपयांच्या नव्या चलनी नोटा सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. या नोटेवर रुपयाच्या चिन्हाच्या आत 'एल' हे अक्षर छापण्यात येणार आहे. तसेच नंबर पॅनेलवरील आकड्यांची चढत्या क्रमाने मांडणी करण्यात येणार आहे. यामुळे नवीन नोट अधिक सुरक्षित होणार आहे.

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, एक हजार रुपयांच्या नोटांचा वापर अधिक सुरक्षित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. यापूर्वी ५०० रुपयांच्या चलनी नोटा सुरक्षा मानकांसह र्मयादित स्वरूपात छापण्यात आल्या आहे. बनावट नोटा तयार होण्याच्या प्रक्रियेला आळा घालण्यासाठी अंकांची मांडणी चढत्या क्रमाने करण्यात येणार आहे. त्यामुळे या नोटा पाहून नागरिकांनी भ्रमित होऊ नये, असे रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले आहे. या नव्या नोटा आल्यानंतर ग्राहकांना खर्‍या व बनावट नोटांमध्ये फरक करणे सोपे होणार आहे.