Whats new

फुटबॉल क्रमवारीत भारत १५५ व्या स्थानी

FIFA RANKING भारतीय फुटबॉल संघाने ‘फिफा’ क्रमवारीतील आपले स्थान एका क्रमांकाने सुधारले आहे. नव्याने जाहीर केलेल्या क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघ १५६ व्या स्थानावरून १५५ व्या स्थानावर आला आहे. जुलै महिन्यात भारतीय संघ १५ क्रमांक घसरून १५६ व्या स्थानावर आला होता. दरम्यान, क्रमवारीतील अग्रस्थान अर्जेंटिनाने कायम राखले आहे. बेल्जियम दुसऱ्या, तर विश्‍वविजेते जर्मनी तिसऱ्या स्थानावर आहे. कोलंबिया चौथ्या, तर ब्राझील पाचव्या स्थानावर आहे.