Whats new

ओडिशातील 'व्हिलर द्विप' आता 'कलाम द्विप'

APJ ABDUL KALAM ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील व्हिलर द्विपचे नाव बदलून त्याला माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव देण्याचा निर्णय ओडिशा सरकारने घेतला आहे. आतापासून व्हिलर द्विपचे नाव अब्दुल कलाम द्विप असे असेल. ओडिशा आणि माजी मुख्यमंत्री बीजू पटनाईक यांचे कलाम यांच्याशी चांगले नाते आहे. बीजू बाबूंनीच 1993 मध्ये कलाम यांच्या सांगण्यावरून व्हिलर द्विप संरक्षण मंत्रालयाच्या ताब्यात दिला होता. या द्विपचे नाव बदलल्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल.

डॉ. अब्दुल कलाम यांचे गेल्या महिन्यात मेघालयमध्ये एका कार्यक्रमादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले होते.