Whats new

‘वन रँक वन पेन्शन’ म्हणजे काय?

ONE RANK ONE PENSION SCHEEM स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या जवानांनाही ‘वन रँक वन पेन्शन’ (ओआरओपी) चा लाभ घेता येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बहुप्रतिक्षित वन रँक वन पेन्शनची घोषणा केली होती. मात्र, स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या जवानांचा यामध्ये समावेश केला नव्हता. यामुळे जवानांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती.

वन रँक वन पेन्शन म्हणजे काय :

वेगवेगळ्या वर्षी निवृत्त झालेल्या मात्र एकाच रँकच्या सैनिकांच्या पेन्शनच्या रकमेत जास्त फरक नसावा किंबहुना ती रक्कम सारखीच असावी. सध्या परिस्थिती अशी आहे की, आधी निवृत्त झालेल्या एकाच रँकच्या लष्करी अधिकाऱ्याला कमी पेन्शन आणि नंतर निवृत्त झालेल्या त्याच रँकच्या अधिकाऱ्याला जास्त पेन्शन मिळतं.

हे कसं ते आपण एका उदाहरणावरुन पाहूया. 2006 साली निवृत्त झालेल्या मेजर जनरलची पेन्शन 30,300 रुपये आहे, तर आता कुणी कर्नल निवृत्त झाल्यास त्याला 34,000 रुपये पेन्शन मिळते. वस्तुत: मेजर जनरल हा कर्नल पदाच्या दोन रँक वरचा अधिकारी असतो.

एकाच रँकच्या पेन्शनमधील ही असमानता केवळ लष्करी अधिकाऱ्यांपर्यंतच मर्यादित नाही. तर शिपाई, नाईक आणि हवालदार रँकचे सैनिकही या असमानतेला बळी पडले आहेत.वन रँक वन पेन्शन म्हणजे सेवनिवृत्त सैनिकांना आता समान पेन्शन असेल. देशात दरवर्षी सुमारे 65 हजार सैनिक निवृत्त होतात. म्हणजेच देशात या घडीला 25 लाख निवृत्त सैनिक आहेत.

काय असते प्रिमॅच्युअर रिटायरमेंट :

सेनेमध्ये सैनिकांना प्रिमॅच्युअर रिटायरमेंटची सुविधा मिळते. असे मानले की, कोणत्याही एका तुकडीत चार लोक आहेत. त्यातील एकालाच बढती मिळणार आहे. अशात जो त्यांच्या बरोबरच्या श्रेणीत होता त्याचे आदेश उर्वरित तिघांना मानावे लागतील. त्यापासून वाचण्यासाठी सैनिकांना प्रिमॅच्युअर रिटायरमेंटची सुविधा मिळते. यासाठी जवानांना 17 वर्षे तर अधिकाऱयांना 20 वर्षांची सेवा पूर्ण करावी लागते. या वेतनश्रेणीचा लाभ तीन दशलक्ष पेन्शनरांना होणार आहे. तसेच एकाच श्रेणीतील माजी सैनिकांना एकच वेतनश्रेणी मिळणार आहे.