Whats new

जीसॅट 6 यशस्वीरित्या अंतराळात स्थिरावले

gsat-6.jpg  

जीएसलव्ही-डी 6 हे यशस्वीरित्या अंतराळातील कक्षेत स्थिरावले आहे. याची माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्त्रो) च्या अधिका-यांनी दिली आहे.

जीसॅट 6 त्याच्या परिप्रभण कक्षेत 83 अंशाच्या कोनामध्ये स्थिर झाले. यावेळी त्याच्यासह इन्सॅट 4-अ, जीसॅट 12, गॅट 10 आणि आयआरएनएसएस 1 सी हे उपग्रहही कक्षेत स्थिरावले आहेत. जीएसलव्ही डी-6 हा उपग्रह श्रीहरीकोटाच्या अंतराळ केंद्रावरून 27 ऑगस्टला 4 वाजून 52 मिनिटांनी सोडण्यात आला. त्यानंतर फक्त 17 मिनिटात 2 हजार 117 किलोग्रॅम वजन घेऊन ते अंतराळात पोहचला होता.हे उपग्रह दोन सोलार ऍरेजच्या माध्यमातून चालू राहतील. त्यांना इंधनाची गरज भासणार नाही. या उपग्रहावर नियंत्रण करण्याचे काम भारतीय अंतराळ संशोधन संस्था करणार आहे. येत्या काही दिवसात या उपग्रहाला मुख्य कक्षेत आणले जाणार असल्याची माहिती इस्त्रोच्या अधिका-यांनी बोलताना दिले.