Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

इटालियन ग्रां प्रि मध्ये हॅमिल्टन विजेता

LEVIS HAMILTON मर्सिडीजतर्फे सहभागी झालेल्या 50 व्या फॉर्म्युला वन शर्यतीत विजेतेपद मिळविताना लेविस हॅमिल्टनने येथे झालेली इटालियन ग्रां प्रि शर्यत जिंकली. या जेतेपदामुळे त्याने ड्रायव्हर्स चॅम्पियनशिपमधील आघाडी त्याने आणखी वाढविली आहे. फेरारीच्या सेबॅस्टियन व्हेटेलने दुसरे व विल्यम्सच्या फेलिप मासाने तिसरे स्थान मिळविले.

हॅमिल्टनचाच संघसहकारी निको रॉसबर्गला तिसरे स्थान मिळाले असते. पण शेवटच्या दोन लॅप बाकी असताना रॉसबर्गच्या गाडीच्या इंजिनने पेट घेतल्याने दुर्दैवाने तो ही शर्यत पूर्ण करू शकला नाही. त्यामुळे मासाला तिसरे स्थान घेण्याची संधी मिळाली. हॅमिल्टनने पोल पोझिशनवरून सुरुवात करीत जेतेपद पटकावले. पहिल्या रांगेत त्याच्यासमवेत फेरारीचा किमी रायकोनेन होता. पण ती नादुरुस्त झाल्याने त्याला मागे रहावे लागले आणि हॅमिल्टन पुढे निघून गेला. या मोसमातील 12 शर्यतीतील त्याचे हे सातवे व कारकिर्दीतील 40 वे जेतेपद असून चॅम्पियनशिप रेसमध्ये त्याने रॉसबर्गवरील आघाडी 28 वरून 53 गुणांवर नेली आहे. पुढील शर्यत सिंगापूरमध्ये होणार आहे. विल्यम्सच्या व्हाल्टेरी बोटासने चौथे स्थान मिळविले.