Whats new

सांगली जिल्हयातील इस्लामपूर मोफत 4जी वायफाय सेवा सुरू करणारी देशातील पहिली नगरपालिका

4-G ISLAMPUR NAGARPALIKA  

मोफत 4जी वायफाय सेवा सुरू करून सांगली जिल्हयातील इस्लामपूर नगरपालिकेने नवा इतिहास घडविला आहे. अशा प्रकारची मोफत सेवा सुरू करणारी ही देशातील पहिली नगरपालिका ठरली आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ विजय भटकर यांनी दोन वर्षांपूर्वी इस्लामपूर शहराला भेट दिली होती. त्यावेळी शहरातील शैक्षणिक संस्था पाहून शहरात मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करण्याची कल्पना मांडली होती. याची दखल घेत तसेच सध्या माहिती तंत्रज्ञानाचे युग असल्याने काळाची पावले ओळखत माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी मोफत वायफाय सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार रिलायन्स जीओ कंपनीमार्फत करार करून नगरपालिका हद्दीत वायफाय सेवा सुरू करण्याचे काम हाती घेतले. त्यानंतर आता प्रत्यक्षात इस्लामपुरात 4जी वायफाय सुविधा सुरू करण्यात आली आहे.