Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

विश्व चॅम्पियनशिपमध्ये योगेश्वर दत्तकडे नेतृत्व

YOGESHWAR DUTT स्टार पैलवान योगेश्वर दत्तच्या नेतृत्वाखाली भारताचा संघ अधिकाधिक ऑलिम्पिक कोटा मिळवण्यासाठी विश्व चॅम्पियनशिपच्या मैदानावर उतरणार आहे. सुशील कुमारच्या अनुपस्थितीमुळे अनेकांच्या नजरा नरसिंह यादव याच्यावर असतील. विश्व चॅम्पियनशिप स्पर्धा रिओ-२०१६ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे; कारण ही पात्रता स्पर्धा आहे. दोन वेळा ऑलिम्पिक पदकविजेता सुशील कुमार हा दुखापतग्रस्त असल्यामुळे भारताच्या नजरा नरसिंह यादवच्या कामगिरीवर असतील.

स्पर्धेसाठी भारतीय संघ असा : फ्रीस्टाईल पुरुष : अमित कुमार (५७ किलो), बजरंग सिंह (६१ किलो), योगेश्वर दत्त (६५ किलो), अरुण (७० किलो), नरसिंह यादव (७४ किलो), नरेश कुमार (८६ किलो), मौसम खत्री (९७ किलो), सुमित (१२५ किलो).

महिला : विनेश (४८ किलो), बबिता (५३ किलो), ललिता (५५ किलो), गीता फोगाट (५८ किलो), सरिता (६० किलो), अनिता (६३ किलो), नवज्योत (६९ किलो), निक्की (७५ किलो). ग्रीकोरोमन : रविंदर सिंह (५९ किलो), दीपक (६६ किलो), एम. रफिक (७१ किलो), गुरुप्रित सिंह (७५ किलो), हरप्रित सिंह (८० किलो), मनोज कुमार (८५ किलो), हरदीप (९८ किलो), नवीन (१३० किलो).