Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

फोर्ब्स एशियाच्या दानशूर यादीत 7 भारतीय

FORBES फोर्ब्स आशियाच्या नवव्या ‘हीरोज ऑफ फिलैनथ्रोपी’ (दानशूर) यादीत सात भारतीयांची नावे सामील आहेत. फिलैनथ्रोपीने पूर्ण आशिया-पॅसिफिक विभागातील 13 देशांच्या दानशूर व्यक्तींची ही यादी तयार केली आहे. 7 भारतीयांपैकी चार जणांमध्ये इन्फोसिसचे चार सहसंस्थापक आहेत. माहितीविषयक तंत्रज्ञान देणा-या कंपन्यांमध्ये इन्फोसिस ही देशातील सर्वात मोठय़ा कंपन्यांपैकी एक मानली जाते.

7 भारतीयांमध्ये दुबई येथील सन्नी वारके यांचे नाव अग्रक्रमावर आहे. केरळात जन्मलेल्या सन्नीनी दुबईत जेम्स एज्युकेशन समूहाची स्थापना केली असून तो 14 देशांतील 70 खासगी शाळांच्या साखळीचे संचालन करतो. त्यांनी 2.25 अब्ज डॉलर्स इतक्या अर्ध्या संपत्तीचे दान बिल गेटस् आणि वॉरेन बफेट यांच्या नेतृत्वाखालील ‘गिव्हिग लेज’ साठी केले आहे.

इन्फोसिसचे इतर संस्थापक एस. गोपालकृष्णन, नंदन नीलेकणी आणि एस. डी. शिबुलाल यांनी आरोग्य व शिक्षण विभागासाठी दान केले आहे. इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांचे चिरंजीव रोहन या यादीत समाविष्ट असून त्यांनी अभिजात भारतीय साहित्याला प्रोत्साहित करण्यासाठी 52 लाख डॉलर्सची रक्कम हॉर्वर्ड विद्यापीठाच्या छापखान्याला दान केली आहे.

या शिवाय सुरेश रामकृष्णन आणि महेश रामकृष्णन या लंडनस्थित बंधूचीही नावे सदर यादीत असून त्यांनी लंडनमध्ये ‘व्हाइटकोम्ब अँड शाफ्टेसबरी टेलर्स’ ची स्थापना केली आहे. त्यांनी भारतातील 4 हजार व्यक्तींना शिलाई कामातील प्रशिक्षण मिळण्यासाठी 30 लाख डॉलर्सची रक्कम दान केली आहे. या प्रशिक्षणार्थीमध्ये 2004 च्या त्सुनामीमुळे पीडित व्यक्ती व आजारी महिला यांचा समावेश असल्याचे समजते.