Whats new

भारतीय वंशाच्या अनिरुद्ध काथिरवेलने स्पेलिंग बी स्पर्धा जिंकली

SPELLING -B

भारतीय वंशाच्या नऊ वर्षांचा अनिरुद्ध काथिरवेलने ऑस्ट्रेलियातील ‘द ग्रेट ऑस्ट्रेलियन स्पेलिंग बी’ स्पर्धा जिंकली. या स्पर्धेचे बक्षीस 50 हजार डॉलर असून, त्याच्या शाळेलाही दहा हजार डॉलरचे साहित्यही देण्यात येणार आहे. तमीळ कुटुंबातील आणि मेलबर्न येथे जन्मलेला काथिरवेलचा गौरव करण्यात आला. अनिरुद्धची स्मरणशक्ती एवढी दांडगी आहे की, तो दररोज सरासरी दहा नवीन इंग्रजी शब्द आत्मसात करतो.

अनिरुद्धचे आई-वडील 16 वर्षांपूर्वी भारतातून ऑस्ट्रेलियात आले होते. अनिरुद्ध म्हणाला की, मी दोन वर्षांचा असताना अभ्यास सुरू केला. आई-वडिलांनी मला सतत प्रोत्साहित केले आणि स्पेलिंगच्या विश्वाचा सखोल अभ्यासासाठी सहकार्य केले. पहिल्या ग्रेडमध्ये शिकत असताना मी प्रथम स्पेलिंग स्पर्धेत सहभाग घेतला होता. मात्र, ती स्पर्धा कठीण होती. हळूहळू माझ्यातील आत्मविश्वास वाढत गेला आणि स्पेलिंगची क्षमता वाढवत गेलो. अनिरुद्धला इंग्रजीबरोबरच तमीळ भाषाही लिहीता आणि वाचता येते. ऑस्ट्रेलियातील स्पेलिंग बी स्पर्धेत अंतिम पाचमध्ये भारतीय वंशांची मुलगी अर्पिताने (वय 8) धडक मारली होती.