Whats new

प्राची सिंगला पाचव्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीत सुवर्णपदक

PRACHI SING

पाचव्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेत भारताने आणखी सात पदकांची कमाई केली. मुलींच्या तिरंदाजीत प्राची सिंगने सुवर्णपदक घेतले. मिश्र दुहेरीच्या टेनिस प्रकारात भारताच्या शशीकुमार मुकुंद आणि धृती वेणुगोपाळ यांनी सुवर्णपदक पटकाविले.

या स्पर्धेत भारताने एकूण 17 पदकांची कमाई केली असून त्यामध्ये सात सुवर्ण, चार रौप्य आणि सहा कांस्यपदके आहेत. या पदक तक्त्यात भारत सहाव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया पहिल्या, इंग्लंड दुस-या, द.आफ्रिका तिस-या, मलेशिया चौथ्या आणि न्यूझीलंड पाचव्या स्थानावर आहेत. मुलींच्या वैयक्तिक रिकर्व्ह तिरंदाजी प्रकारात प्राची सिंगने सुवर्णपदक घेतले. तिने सुवर्णपदकाच्या लढतीत बांगलादेशच्या नंदिनी खान शोपनाचा पराभव केला. मिश्र सांघिक प्रकारातही तिने पहिले स्थान मिळविले. पण या प्रकारासाठी ठेवण्यात आले नव्हते.

टेनिस या क्रीडाप्रकारात सांघिक मिश्र दुहेरीत शशीकुमार मुकुंद आणि धृती वेणुगोपाळ यांनी भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. मुष्टीयोद्धा गौरव सोळंकीने 52 किलो गटात, तिरंदाज निशांत कुमावतने मुलांच्या रिकर्व्ह वैयक्तिक प्रकारात, स्क्वॅशमध्ये मिश्र सांघिक प्रकारात व्ही.सेंथिलकुमार आणि हर्षित जवांदा यांनी रौप्यपदके, मुष्टियोद्धे एल.भीमचंद सिंग 49 किलो गटात आणि प्रयाग चौहानने 64 किलो गटात कांस्यपदके मिळविली. टेनिस या क्रीडा प्रकारात भारताच्या शशीकुमार मुकुंद आणि ध्रृती वेणुगोपाळ यांनी अनुक्रमे मुले व मुली एकेरीची अंतिम फेरी गाठली आहे. मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात शशीकुमार आणि वेणुगोपाळ यांनी स्कॉटलंडच्या मॅग्लेंड आणि लुम्सडेन यांचा 7-6 (7-4), 6-3 असा पराभव करत भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले.