Whats new

वयस्करांच्या दृष्टीने स्वित्झर्लंड सर्वोत्तम देश

Swizerland

साठ वर्षांवरील वयस्करांसाठी स्वित्झर्लंड हे नंदनवन असून संस्कृतीला सदैव चिकटून राहणा-या भारताचा क्रमांक मात्र 96 देशांच्या यादीत 71 वा आहे. ‘द ग्लोबल एजवॉच इंडेक्स 2015’ नामक अहवालात याबाबतचे मत व्यक्त करण्यात आले आहे. त्यानंतर वयस्कर व्यक्तींच्याबाबतीत नॉर्वे, स्वीडन, जर्मनी, कॅनडा, नेदरलँडस्, आईसलँड, जपान, अमेरिका, ब्रिटन आणि डेन्मार्क हे देश उत्तम जागा ठरतात, असे सदर अहवालाने म्हटले आहे.

जगातील 60 वर्षांवरील वयस्करांची संख्या 116.6 दशलक्ष आहे. 96 देशांमध्ये भारताचा 71 वा क्रमांक, वयस्करांची सामाजिक प्रतिष्ठा व आर्थिक सुस्थिती यावरून काढण्यात आला आहे. भारतातील वयस्करांची संख्या 2030 मध्ये 12.5 टक्के होण्याची शक्यता असून 2050 पर्यंत ती 19.4 टक्के होईल, अशी अपेक्षा करण्यात आली आहे. तसेच आरोग्यसंपन्न वयस्करांची शक्यता 12.6 टक्क्यापर्यंत धरण्यात आली आहे. आर्थिक उत्पन्न, निरोगी प्रकृती, शिक्षण, रोजगार व त्यांना चालना देणारी परिस्थिती या निकषावर काढण्यात आलेल्या क्रमवारीत श्रीलंका (46), चीन (52), बांगला देश (67), नेपाळ (70) पाकिस्तान (92) असे चित्र असून सदर यादीच्या अगदी तळाला अफगाणिस्तानचा क्रम आहे.