Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

इस्रायली ‘हेरॉन ड्रोन’ खरेदीला भारताची मंजुरी

ISRAYLI HERON DRONE

भारताचे हवाई दल अधिक बळकट करण्यासाठी इस्रायलच्या शस्त्रांनीयुक्त 10 ड्रोन्स खरेदीसाठी शासनाने मंजुरी दिली आहे. 400 दशलक्ष डॉलर्सच्या शस्त्रसज्ज 10 हेरॉन जातीच्या ड्रोन्सच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. विशेष करून टेहळणीसाठी उपयुक्त असणा-या ड्रोन्सचे संचालन भारतीय हवाई दलाकडून केले जाते. वैमानिकविरहित ‘हार्पी’ ड्रोन्समध्ये शत्रूच्या रडार यंत्रणा नष्ट करण्याचे सामर्थ्य असल्याचे कळते.

सदर शस्त्रसज्ज ड्रोन्स हवाई दलामध्ये एका वर्षात सामील होण्याची दाट शक्यता आहे. सशस्त्र दलाने या विमानांच्या खरेदीचा प्रस्ताव 2012 मध्येच ठेवला होता. पण त्यावेळी संपुआ-2 शासनाकडून त्याला राजकीय समर्थन मिळाले नव्हते. मोदी शासनाने यावर्षी सदर प्रस्तावाचे पुनरुज्जीवन केले आहे. वैमानिकविरहित धर्तीच्या ड्रोन्ससारखीच हेरॉन विमाने असून ती टेहळणी करतातच. पण त्याशिवाय लढण्याचे व तत्सम भूमिका पार पाडण्याचे वैशिष्टय़ही त्यामध्ये आहे. ही विमाने 1 हजार किलो इतक्या शस्त्रांचे वजन पेलू शकतात. तसेच शत्रूच्या प्रदेशात घुसून हवेतून जमिनीवर मारगिरी करण्याचे सामर्थ्य त्यांच्या क्षेपणास्त्रात आहे. याआधी फक्त टेहळणी करून शत्रूची महत्त्वपूर्ण बातमी मिळविण्याचे काम भारताकडून पार पाडण्यात आले आहे. याखेरीज शत्रू प्रदेशात जाण्यास किंवा दहशतवादी तळ नष्ट करण्यासाठी अशा प्रकारच्या विमानांचा उपयोग होणार आहे. विशेषकरून जूनमधील मणिपूर हल्ल्याने ही जाणीव निर्माण करून दिली, असे एका अधिकाऱयाने सांगितले.

भारताने ‘रुस्तुम-2’ हय़ा स्वदेशी ड्रोन विमानाची तयारी चालू केली आहे. हे विमान ‘डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन’ (डीआरडीओ) या संशोधन संस्थेकडून विकसित केले जात आहे. अनेक वर्षे चालणारा हा प्रकल्प असून त्याच्या शस्त्रसज्ज चाचण्या अद्याप व्हायच्या आहेत. ‘हेरॉन’ ड्रोन्ससंदर्भात नवी दिल्लीत ‘इस्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीज’मधील ज्येष्ठ तज्ञांचे एक पथक आले असून भारताच्या साहाय्याने ड्रोन्स बनविण्याच्या संयुक्त प्रयत्नात ते असल्याचे समजते.