Whats new

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत पेस-हिंगीसला जेतेपद

lyaander peas-hingis

भारताचा टेनिसपटू लिएंडर पेस आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस या जोडीने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले. अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत प्रथम जेतेपद मिऴविणारी ही जोडी ठरली आहे.

मिश्र दुहेरी सामन्याच्या अंतिम फेरीत लिएंडर पेस आणि मार्टिना हिंगीसने अमेरिकेची बेथानी माटेक सँड्स आणि सॅम क्वेरी या जोडीचा ६-४,३-६,१०-७ असा पराभव केला आणि ग्रँड स्लॅम जेतेपदावर नाव कोरले. लिएंडर पेस आणि मार्टिना हिंगीस या जोडीने यापूर्वी ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डन विजेतेपद पटकावले होते. पेसने भारताच्याच महेश भूपतीच्या साथीने कारकिर्दीत सर्वाधिक 9 ग्रँडस्लॅम विजेतेपदे मिळविलेली आहेत.