Whats new

आयपीटीएल टेनिस : विराट कोहलीच्या टीममध्ये आता फेडररची सर्व्हिस!

virat-fedla

स्विसकिंग रॉजर फेडरर आता लवकरच भारतीय कसोटी टीमचा कर्णधार विराट कोहलीच्या संघाकडून सर्व्हिस करताना दिसणार आहे. डिसेंबरमध्ये दुसर्या सत्राची आंतरराष्ट्रीय प्रीमियर टेनिस लीग (आयपीटीएल) होणार आहे. या आयपीटीएलमध्ये फेडरर हा विराट कोहलीच्या टीमचे प्रतिनिधित्व करणार आहे. कोहलीने नुकताच या लीगसाठी यूएई रॉयल्स टीमसोबत सहमालक म्हणून करार केला आहे. त्यामुळे आता कोहलीची टीमही या लीगमध्ये खेळणार आहे. फुटबॉलपाटोपाठ आता विराट कोहलीने टेनिसमध्येही संघ खरेदी केला.

कोलीच्या याच टीममध्ये जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर असलेला रॉजर फेडररही सहभागी झालेला आहे. सचिनला आपला आदर्श मानणार्या कोहलीने आपल्या टीमसाठी फेडरसोबत करार केला आहे.

असा आहे यूएई रॉयल्स संघ
जागतिक क्रमवारीत दुसर्या स्थानावर असलेल्या रॉजर फेडररसह यूएई रॉयल्स संघात मरिन सिलिच, माजी नंबर वन अॅना इवानोविक, माजी विम्बल्डन चॅम्पियन गोरान इवानिसेविच, २०१४ च्या ऑस्ट्रेलियन ओपनमधील मिश्र दुहेरीचा विजेता क्रिस्टिना मलादेनोविच, कॅनडाचा डॅनियल नेस्टर, चेक गणराज्यचा बर्डिच सहभागी झाले आहेत. रवी शास्त्री टीमचे सल्लागार : रवी शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली कोहलीचा यूएई रॉयल्स संघ आयपीटीएलमध्ये खेळणार आहे. शास्त्री यांची सल्लागारपदी नियुक्ती झाली.