Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

‘सून-शू’ ठरले जगातील सर्वात उंच दाम्पत्य

soon-shu

चीनमधील सून मिंग मिंग आणि शू यान हे जगातील सर्वात उंच विवाहित जोडपे ठरले असून, त्यांची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्यात आली आहे.

गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे मुख्य संपादक क्रेग ग्लेंडे यांनी या दोघांची अचूक उंची मोजली. दिवसातून तीन वेळा उंची मोजल्यानंतर दोघांची एकत्रित उंची 423.47 सेंटीमीटर म्हणजेच 13 फूट 10.72 इंच इतकी नोंदविण्यात आली. त्यानंतर या जोडप्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडून प्रमाणपत्र देण्यात आले.

2009मध्ये चीनच्या नॅशनल गेम्समध्ये सून आणि शू यांची ओळख झाली. पुढे दोघांचे सूत जुळले आणि 4 ऑगस्ट 2013 मध्ये ते विवाहबद्ध झाले. आपल्या उंचीचा गौरव होत असताना प्रवासादरम्यान तसेच दररोज अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र, त्याची आता सवय झाल्याचे सून याने सांगितले.